पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : सत्र न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : इन्स्टाग्रामवर चॅटिंगद्वारे मैत्री वाढवून पर्सनल फोटो घेऊन बदनामीची धमकी देणाऱ्याला दिल्लीतून पुणे सायबर पोलिसांनी जेरबंद केले. पुणे- शिवाजीनगर सत्र न्यायालयाने त्याला १३ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यश बाबासाहेब भंडारे (वय १९, रा. बुद्धविहार, तष्कंद भवन सोसायटी, राजा मिलिंद सोसायटी, ठक्कर बाप्पा कॉलनी, चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पुणे सायबर पोलिसांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बनावट इन्स्टाग्राम अकाउंटची माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपी मुंबईत राहत असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. पुणे-शिवाजीनगर सत्र न्यायालयाने त्याला १३ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षिका संगीता माळी, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पोलीस हवालदार राजेश केदारी, राहुल हंडाळ, अस्लम अतार, अंकिता राघो, जान्हवी भडेकर यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी केली.
दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने इन्स्टाग्राम वा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुला-मुलींशी ओळख करून त्यांच्याशी मैत्री वाढवित गुन्हे करणाऱ्यांपासून सावध राहावे, अज्ञात किंवा अनोळखी व्यक्तीशी फोटो शेअर करू नयेत, असे आवाहन पुणे शिवाजीनगर सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
