आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

संघटित गुन्हेगारी करणाऱ्यावर मोक्कांतर्गत कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

सोलापूर पोलीस आयुक्तांचा आदेश : सोलापूर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये २७ गुन्हे दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : संघटित गुन्हेगारी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, सरकारी नोकरावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. यासाठी सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रस्ताव पाठविला होता.

संतोष संजय कांबळे (वय २९, रा. जयमल्हार चौक, भगवती मंदिरापाठीमागे, आडवा नळ, सोलापूर) असे मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कांबळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध सोलापूर पोलीस आयुक्तालयांतर्गत फौजदार चावडी, जेलरोड, जोडभावी पेठ, एमआयडीसी व सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये मालाविषयी व शरीराविषयी एकूण २७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सोलापूर शहरच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. बी. देशमाने, उबाळे, पोलीस नाईक गायकवाड, वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.