आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 13, 2022
Spread the love

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : शिवणेतील यशोराही हॉस्पिटलसमोर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. शिवणे येथील यशोराही हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अपघात झाला.

सुंदरराव राघोबा कोकडवार (वय ७५, रा. निर्माण परिजात, शिविशाही कॉलनी, कर्वेनगर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा योगेश कोकडवार (वय ४२, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल सुंदरराव राघोबा कोकडवार (वय ७५, रा. निर्माण परिजात, शिविशाही कॉलनी, कर्वेनगर, पुणे) यशोराही हॉस्पिटलसमोरील रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगातील रिक्षाची धडक बसून अपघात झाला, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.