आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोयत्याने जखमी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 14, 2022
Spread the love

वारजे-माळवाडी पोलिसांत फिर्याद : न्यू कोपरे येथील वांजळे कॉम्प्लेक्समध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. वारजे येथील न्यू कोपरेगावमधील वांजळे कॉम्प्लेक्स येथे १२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली.

महेश विजय वांजळे (वय २५, रा. न्यू अहिरे गाव, वारजे), शुभम कृष्णा ऊर्फ किसन मानकर (वय २४, रा. दांगट इस्टेट, शिवणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे असून, इतर दोघे फरार आहेत. याप्रकरणी दत्ता वाव्हळकर (वय २५, रा. वारजे, पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून, ९ जानेवारी २०२२ रोजी किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाली. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करीत कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घराचे व दुकानाचे दरवाजे बंद करून घेतले. यावेळी आरोपीने हातातील कोयता नाचवत रस्त्यावरून आरडाओरडा करीत परिसरात दहशत माजविली. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पडवळे पुढील तपास करीत आहेत.