आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएमपी बसमध्ये २५ हजार रुपयांच्या सोन्याची चैनचोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांत फिर्याद : भारती विद्यापीठ-स्वारगेट दरम्यान बसमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भारती विद्यापीठ- स्वारगेट दरम्यान पीएमपी बसमध्ये ज्येष्ठ महिलेची २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. रविवारी (दि. १५ जानेवारी २०२२) दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान बसमध्ये चोरट्याने डाव साधला.

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये ७५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला भारती विद्यापीठ ते स्वारगेट पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एच. बी. भोसले पुढील तपास करीत आहेत.