आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुतारदऱ्यातील कुणाल धर्मे टोळीतील 8 जणांवर ‘मोक्का’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 22, 2022
Spread the love

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांची 66 वी कारवाई : वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पाठविला प्रस्ताव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शरीराविरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच वेळोवेळी गुन्हे करणार्‍या सुतारदरा येथील कुख्यात कुणाल धर्मे याच्यासह त्याच्या टोळीतील 8 जणांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत तब्बल 66 वेळा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

कुणाल हेमंत धर्मे (वय २१, रा. भुगाव, पौड), यशराज हनुमंत शिंदे (वय १९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), योगेश राम दबडे (वय २१, रा. शिवणे), धीरज नथु कुडले (वय २७, रा. सुतारदरा, कोथरूड), महेश शाम सातपुते (वय २६, रा. सुतारदरा, कोथरूड), रोहित सुरेश सातपुते (वय २६, रा. सुतारदरा), संतोष निवेकर (रा. भुगाव, पौड) आणि तुषार पोकळे (रा. पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील ते धजावत नसल्यामुळे तसेच त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला होता. पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी तो प्रस्ताव अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअंतर्गत 8 जणांवर कारवाई केली आहे. आयुक्त गुप्ता यांनी मोक्का कायद्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून आतापर्यंत 66 वी कारवाई केली आहे.