आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नॅशनल स्केटिंग चॅम्पियनमध्ये शाश्वत कांस्यपदकाचा मानकरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 22, 2022

पणजी येथे झाल्या स्पर्धा : आंतरराष्ट्रीय खेळामध्ये विविध राज्यातील खेळाडूंनी नोंदवला सहभाग

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये सात वर्षांखालील गटात पुण्याच्या शाश्वत महावीर कासार याने कांस्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये देशभरातील राज्यातून नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

मिशन ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने पणजी येथे नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्रातर्फे पुण्याच्या शाश्वत महावीर कासार याने सात वर्षाखालील वयोगटात सहभाग घेतला होता. त्याने आतापर्यंत पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, त्यामध्ये मिशन ऑलिम्पिक स्टेट स्केटिंग चॅम्पिअनशिप २०२१ व इतर स्पर्धांचा समावेश आहे. शाश्वतने अवघ्या ३ महिन्याच्या प्रशिक्षणाच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शॉर्ट रेस व लाँग रेसमध्ये सहभाग घेऊन एका कांस्यपदकाचाही तो मानकरी ठरला आहे. शाश्वत हूम मॅक हेनरी मेमोरियल स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, त्याला रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडेमीचे प्रशिक्षक विजय मल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाश्वच्या यशाचे शाळा आणि परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले.

get_footer();