आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘तू कोण कुठला म्हणत पीएसआयची गचांडी धरणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 24, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांची कारवाई : तुळापूर येथील गायरानावर शनिवारी घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला अडवून पोलीस उपनिरीक्षकाची गचांडी धरुन हाताने मारहाण करुन आरोपीला पळून केला. तुळापूर येथे शनिवारी (दि. २२ जानेवारी २०२२) दुपारी सव्वाबारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

संपत बबन शिवले (वय ४१, रा. तुळापूर) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात शस्त्राचा वापर करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यातील आरोपी तेजस साळवे, चंद्रकांत पोपट शिवले, राम पोपट शिवले (सर्व रा. तुळापूर) यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, पोलीस हवालदार पांडुरंग माने, अंमलदार बाळासाहेब तनपुरे हे तुळापूरला शनिवारी दुपारी गेले होते. भट्टीवस्तीजवळील क्रिकेट मैदानाजवळ त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करत असताना संपत शिवले, राम पोपट शिवले यांनी “तू कोण कुठला, पीएसआय, तुझ्या घरी इथ शहाणपणा करायचा नाही़, सोड मला तू कमिशनर जरी असला तरी मला काय” असे म्हणत त्याने फिर्यादीची गचांडी धरुन समोर ओढले. संपत शिवले याने “तू कोण, तुझा काय संबंध” असे म्हणून गोरे यांच्या अंगावर येऊन हाताने मारु लागला. तेव्हा ते बाजूला सरकले असताना त्यांच्या डोळ्यावरील चष्मा खाली पडला. फिर्यादी यांनी “आम्ही पोलीस असून, आरोपी ताब्यात घेत आहोत. सरकारी काम चालू आहे. आपणमध्ये पडु नका आम्हास सहकार्य करा,” असे सांगूनही अरेरावी करीत फिर्यादीच्या अंगावर धावून आले. त्यांच्याबरोबरच्या पोलिसांनी त्याला मागे ओढून ठेवले, तरीदेखील त्याने शिवीगाळ करुन धमकी दिली. या गडबडीत तेजस साळवे हा पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश भोसले अधिक तपास करीत आहेत.