आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

४२ वर्षीय महिलेवर अनैसर्गिक अत्याचार करणारे दोघे अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 24, 2022
Spread the love

कोरेगाव पार्क पोलिसांत फिर्याद : असह्यतेचा गैरफायदा घेत धमकी देऊन केला अतिप्रसंग

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पतीसमवेत रहात नसलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला धमकावून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २०१८ पासून सुरु होता.

भरत जेठामल गांधी (वय ५३, रा. एकबोटे कॉलनी) आणि दिलीप पुष्कराज ओसवाल (वय ५३, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क येथे राहणार्‍या एका ४२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी या त्यांच्या पतीसमवेत रहात नाहीत, याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केला. धमकी देऊन फिर्यादी यांच्याबरोबर जबरदस्तीने अनैसर्गिक शरीरसंबंध केला. आरोपींनी धमकाविले असल्याने त्यांनी इतके दिवस फिर्याद दिली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत.