आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आजारी मालकाला ड्रायव्हरने घातला ५१ लाखांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 25, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : आरोपीसह पत्नी, बहीण, भाऊ यांच्यावर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मालक आजारी असल्याचे सांगून बांधकामासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून वेळोवेळी बँकेतून पैसे काढले. कागदपत्रावर सह्या घेऊन त्यांची मोटार व मोटारसायकल विकून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

शाहिन रफिक छागला (वय ४०, रा. कुल होम्स, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरीफ ऊर्फ हनिफ सय्यद, हनिफ दस्तगीर सय्यद (वय ३९, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) व त्यांची पत्नी, बहिण, भाऊ यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरीफ सय्यद हा फिर्यादी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. फिर्यादी यांचे पती आजारी आहेत. आरीफ याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वडगाव शेरी येथील बांधकाम साईटवरील वेगवेगळ्या कामासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे भासवले. त्याने पत्नी, भाऊ, बहिणीशी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडून २५ लाख रुपये बँकेतून काढून घेतले. फिर्यादी यांची चारचाकी गाडी फिर्यादीच्या परवानगीविना आरटीओकडील टीटी फॉर्मवर खोटी सही करुन साडेसात लाख रुपयांना विकली. तसेच त्यांची मोटारसायकल घेऊन अशी एकूण ५१ लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.