आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खोटा दस्त अस्तित्वात आणून मोठी आर्थिक फसवणूक!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 26, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांत फिर्याद : हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खराडी अ‍ॅग्रो ट्रेडींग कंपनीचा विकसन करारनामा बनावट कागदपत्रांच्या आधारे रद्द करुन ती जमीन दुसऱ्या कंपनीस विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2008 ते 2013 दरम्यान वडगाव शेरी येथे घडला आहे.

येरवडा पोलीस ठाण्यात हानिफ सोमजी, सोहेल सोमजी), अनलेश सोमजी, जेनिस सोमजी (सर्व रा. बोट क्लब रोड, पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खराडी अ‍ॅग्रो ट्रेडींग कंपनीचे संचालक इकबाल मस्तान शेख (वय-37 रा. हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हे खराडी अ‍ॅग्रो ट्रेडिंग कंपनीचे संचालक होते. कंपनीने त्यांना 2010 साली संचालक पदावरुन कमी करण्यात आले. यानंतर या कंपनीचे निझार मेवानी व नुरजहा मेवानी हे संचालक होते. 2015 मध्ये फिर्यादी कंपनीचे संचालक झाले. दरम्यान कंपनीने हनिफ सोमजी याच्याकडून वडगाव शेरी येथील 6.6 आर जमीन विकसन करारनामा करुन घेतली होती. हा करारनामा कंपनीच्या वतीने अलनेश सोमजी याने केला होता. या मोबदल्यात कंपनीने हनिफ सोमजी याला 33 लाख रुपये दिले होते. त्यानंतर हनिफ सोमजी याने कंपनीच्या नावाने दस्त लिहून दिला होता. त्यानंतर 2013 मध्ये आरोपी हानिफ सोमजी आणि सुर्या रियालिटी प्रा. लि. यांनी मिळून फिर्यादी यांच्या कंपनीने खरेदी केलेली जमीन शाम मानकर व इतर भागिदारांना विकली. हानिफ सोमजी याने कंपनीच्या वतीने दस्तावर सही केली. यासाठी आरोपींनी संगनमत करुन दस्त करुन देताना कंपनीचे कुलमुख्यत्यारपत्र रद्द केले.

आरोपींनी खरेदीखत करुन देताना फिर्यादी यांच्या कंपनीच्या नावाने चेक घेतले. तसेच फिर्यादी यांच्या कंपनीच्या नावाने तीन बँकांमध्ये बनावट खाते उघडून त्यामध्ये धनादेश वटवले.

प्रत्यक्षात फिर्यादी यांची आरोपींनी धनादेश वटवलेल्या बँकांमध्ये खाते नाहीत. आरोपींनी बँक खाते उघडताना कंपनीचे बनावट कागदपत्र सादर करुन व त्यावर खोटे रबरी शिक्के वापरुन कंपनीचे बनावट अकाउंट सुरु केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी खरेदीखत पाहिले असता हानिफ सोमजी, सोहेल सोमजी यांनी सुर्या रियालिटी तर्फे संमती देणार म्हणून सही करुन त्याचे नातेवाईक अनलेश सोमजी जेनिस सोमजी यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांची जमीन शाम मानकर यांचे भागिदार यांना विकून फिर्यादी यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करीत आहेत.