आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 1, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडीतील शिवा फार्माजवळ झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सोरतापवाडी येथील शिवा फार्मजवळ २८ जानेवारी २०२२ रोजी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

सतीश गुंडीबा देडे (वय ४७, रा. चोरगेवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुमीत देडे (वय २१, रा. चोरगेवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल इलेक्ट्रिशियनचे काम संपवून मोटारसायकवरून घरी जात होते. त्यावेळी भरधाव अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसून अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.