आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गांजा विक्री करताना सराईत गुन्हेगाराला अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 1, 2022
Spread the love

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : आंबेडकरनगर येथून २३ हजार रुपयांचा गांजा जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला गांजा विक्री करताना मार्केटयार्ड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरनगर येथे करण्यात आली. आरोपीकडून 23,050 रुपयांचा 1134 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.

अजय उर्फ गोट्या भागप्पा मुळे (वय-27 रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, आंबेडकरनगर परिसरामध्ये एक रेकॉर्डवरील गुन्हेगार गांजाची विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांना समजली. त्यानुसार तपास पथकाने आंबेडकरनगर येथे सापळा रचून आरोपीला गाजांची विक्री करताना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी इत्यादी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस सहायक पोलीस निरीक्षक के.बी. डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक भोसले, शिंदे पोलीस अंमलदार माळी, शेख, गायकवाड, घुले, मुठे, बधे यांच्या पथकाने ही कारवाई केली.