आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : मांजरी खुर्द वाघेश्वरी दूध डेअरीसमोर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव डंपरची दुचाकीला धडक बसल्याने महिलेला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. मांजरी खुर्द वाघेश्वर दूध डेअरीसमोरील रस्त्यावर १३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला.

जयश्री श्रीकृष्ण कुवर (वय ४५, रा. मुंढवा, केशवनगर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विद्र महाजन (वय ४५, रा. आव्हाळवाडी, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पत्नीला घेऊन दुचाकीवरून मांजरी खुर्द वाघेश्वर दूध डेअरीसमोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी वाघोली दिशेने भरधाव वेगात आलेल्या डंपरची धडक बसून अपघात झाला. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे करीत आहेत.