आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : पुणे-नगर रस्त्यावर वाघोली चौकात झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. वाघोलीतील वाघेश्वर चौकातील पेट्रोल पंपासमोर पुणे-नगर रस्त्यावर हा अपघात ११ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.

ईश्वर भगत गेवागन (वय २७) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भगत गेवागन (वय ५०, रा. एरमशाही पो घुरसेना, ता.नवागड, जि. बेमेतरा, छत्तीसगड) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा मुलगा ईश्वर भगत गेवागन वाघोली (ता. हवेली) वाघेश्वर चौकातून पुणे-नगर रस्त्याने पायी जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ पुढील तपास करीत आहेत.