आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पेट्रोल पंपावर दरोडाच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 17, 2022
Spread the love

खडक पोलिसांत फिर्याद : शंकरशेठ रोडवर गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

गणेश मल्लेश रायचूर (वय २७, रा. एस आर ए बिल्डिंग, कात्रज), सादिक फिरोज खान (वय २२, रा. लोहियानगर), सुरज नंदु सकट (वय २२) आणि सागर राजू अवघडे (वय ३०, रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार मन्या पळून गेला. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष सूर्यकांत क्षीरसागर यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-३चे पथक मंगळवारी रात्री ९ वाजता गस्त घालत असताना शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपाजवळील चुन्नीकृपा बिल्डिंगच्या बाजूला अधांरात काही जण थांबले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना घेरुन पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सत्तूर, नायलॉन दोरी, मिरची पावडर, चाव्या, मोपेड, मोबाईल मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एकत्र आल्याची कबुली दिली.