आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वीजजोड बंद केल्यामुळे शिवीगाळ करत धमकी देणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 18, 2022
Spread the love

चतुश्रुंगी पोलिसांची कामगिरी : रेंजहिल रोड येथील राजेश्री व्हिला सोसायटीत घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वीजजोड बंद केल्याने चिडून शिवीगाळ करीत तुझ्याकडे बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देणाऱ्यास चतुश्रुंगी पोलिसांनी अटक केली. रेंजहिल रोड येथील राजेश्री व्हिला सोसायटी येथे १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.

अभिजित राजू सोनुले (वय ३१, रा. यशोजय सोसायटी, भोसलेनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जयवंत साळुंखे (वय २८, रा. अशोकनगर, पुणे) यांनी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्याचे सहकारी रेंजहिल रोड येथील राजेश्री व्हिला सोसायटी, पुणे येथे विद्युत बिल वेळेत भरले नसल्याने वीजजोड कट करून लाईट बंद केली. त्यामुळे आरोपीने फिर्यादीची कॉलर धरून वीजजोड पूर्ववत करून द्या असे म्हणत हातातील यादी ओढून घेत फाडली व शिवीगाळ करून तुझ्याकडे बघून घेतो, जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव पुढील तपास करीत आहेत.