आवृत्ती पुणे
← Back to Homepage

७ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला पकडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 19, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांची कामगिरी : मंगळवार पेठेतील गणपती मंदिरासमोर घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील विधीसंघर्षित बालकाला फरासखाना पोलिसांनी पकडले. मंगळवार पेठेतील गणपती मंदिरासमोर फरासखाना पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले.

फरासखाना पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील मागील सात वर्षांपासून फरार असलेला विधी संघर्षित बालक श्रमिकनगर, मंगळवार पेठ येथील गणपती मंदिरासमोर उभा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला गुन्ह्यातील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस अंमलदार तुषार खडके, अजित शिंदे, रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, पंकज देशमुख, सयाजी चव्हाण, अभिनय चौधरी, मेहबुब मोकाशी, मोहन दळवी, वैभव स्वामी, राकेश क्षीरसागर, ऋषिकेश दिघे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();