आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सीना नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 21, 2022
Spread the love

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : ९० लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

सोलापूर : अवैध वाळू उपसा करणाऱ्या तिघांना अटक करून एक पोकलेन, एक जेसीबी, तीन हायवा टिपर, वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर असा एकूण ९० लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सोलापूर ग्रामीण एलसीबी पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.

महादेव अरुण पवार (वय २८, रा. कुर्डू), सागर गोरख घुगे (वय २८, रा. लवूळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. इंद्रजीत महाडिक, योगेश पराडे, आनंद माळी हे तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वाहनचालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुंगशी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील सीना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सीना नदीपात्रातून काही इसम जेसीबी पोकलेनच्या साहाय्याने नदीपात्रातील वाळू हायवा टिपर, ट्रॅक्टरमध्ये भरत असताना आढळून आले. आरोपींना ताब्यात घेऊन १० ब्रास वाळू, एक पोकलेन, एक जेसीबी, तीन हायवा टिपर, तीन ट्रॅक्टर असा एकूण ९० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, शिवाजी घोळवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कारटकर, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन मागाडे, चालक पोलीस शिपाई केशव पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.