आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जन्मदातीने पोटच्या १३ वर्षाच्या पोराचा गळा घोटला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 21, 2022
Spread the love

येडगाव (ता.जुन्नर) मधील घटना – अनैतिक संबंधाला ठरत होता अडथळा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जन्मदात्या आईनेच १३ वर्षाच्या मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार येडगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक कारण समोर आला. ज्या कारणासाठी आईने मुलाचा गळा आवळून खून केला ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

विद्या कदम असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. 20 जानेवारी 2022 रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास राहत्या घरी महिलेने आपल्या 13 वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. महिलेने परकरच्या नाडीने गळा आवळून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगा झोपेत होता. गळा आवळल्याने मुलगा तडफडू लागला. त्यानंतर स्वत:च मुलाला रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला नारायणगाव येथे खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान 27 जानेवारी 2022 रोजी 7 दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला. याबाबत विद्या कदम हिने ससून रुग्णालयात खोटे कारण सांगत घडलेली माहिती लपवली आणि मुलाचा अंत्यविधी केला.

पोलिसांना आला घातपाताचा संशय

मृत मुलाचे कागदपत्रे पोलिस ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मुलाचा घातपात झाल्याचा संशय आला. पोलिसांना संशय आल्याने विद्या कदमला चौकशीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनला बोलावले होते. मात्र, तिने उडवा उडवीची तसेच असमाधानकारक उत्तरे दिली. पोलिसांच्या चौकशीत विद्या कदम यांच्या बोलण्यात विसंगती आल्याने ती काहीतरी लपवत असल्याचा संशय आला.

तिच्याकडे सखोल चौकशी केली त्यावेळी तिने अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. नारायणगाव पोलीस ठाण्यात मुलाचे वडील सचिन शंकर कदम यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पुढील तपास करीत आहेत.