आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बंद सदनिका फोडून तीन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

विमानतळ पोलिसांत फिर्याद : लोहगावमधील तान्हाई कृपा बिल्डिंगमध्ये झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोहगावमधील तान्हाई कृपा बिल्डिंगमधील सदनिका फोडून दोन लाख ९८ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना २० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी बारा ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.

तीर्थराज रासकर (वय ५९, रा. आनंदनगर, धानोरी रोड, लोहगाव, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, लोहगावमधील तान्हाई कृपा बिल्डिंगमधील फ्लॅट कुलूपबंद होता. अज्ञात चोरट्यांनी २० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी बारा ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा उचकटून दोन हजार ५०० रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव पुढील तपास करीत आहेत.