आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जेधे चौकात पादचाऱ्याचा मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 24, 2022
Spread the love

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : स्वारगेटमधून सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याचा मोपेडवरील चोरट्यांनी मोबाईल चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेटमधील जेधे चौकात पहाटे सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास २२ फेब्रुवारी २०२२ रोजी मोबाईल चोरीची घटना घडली.

सचिन कांबळे (वय ३१, रा. नऱ्हे, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी स्वारगेट येथील जेधे चौकातून सारसबागेकडे पायी जात होते. त्यावेळी मोपेडवरील इसम जवळ आले आणि हातातील अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले. स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एच. भोसले पुढील तपास करीत आहेत.