आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रेकॉर्डवरील आरोपीला तांत्रिक विश्लेषणाद्वारे केली अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 24, 2022
Spread the love

सोलापूर ग्रामीण एलसीबीची कारवाई : ८०हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : मोबाईल चोरट्याला अटक करून ८० हजार रुपये किमतीचे आठ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल चोरणाऱ्यास सोलापूर ग्रामीणच्या एलसीबी पथकाने पानवन (ता. माण, जि. सातारा) येथून आरोपीला अटक केली.

आरोपीकडून आठ वेगवेगळ्या कंपन्यांचे ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले. आरोपी रेकॉर्डवरील असून, त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात चोरीचे ७ गुन्हे दाखल आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरारी होता.

नितीन अर्जुन तुपे (वय ३४, रा. पानवन, ता. माण, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वेळापूर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषणात आरोपी गारवाड (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून व्हिवो, ओपो, असूस, रेडमी अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे आठ मोबाईल ८० हजार रुपयांचे हस्तगत करण्यात आले. आरोपी रेकॉर्डवरील असून, त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात चोरीचे ७ गुन्हे दाखल आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरारी होता.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम बागवान यांच्या पथकाने ही कामगिरी केली.