आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन चोरणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 24, 2022
Spread the love

कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी : एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोरेगाव पार्कमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने साडेतीन तोळ्याची चेन चोरणाऱ्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून साडेतीन तोळ्याची चेन आणि डिओ मोपेड असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


सनी संजय सपकाळ (वय २४, रा. संत गाडगेमहाराज वसाहत, कोरेगाव पार्क, पुणे) आणि साहिल ऊर्फ छोट्या राजेंद्र थोरात (वय १९, रा. कवडेवाडी लेन नं.५, कोरेगाव पार्क, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव पार्क येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया गेटजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने साडेतीन तोळ्याची चेन हिसकावून पसार झालेले आरोपी संत गाडगे महाराज विद्यालय परिसरात स्कुटीवर फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून साडेतीन तोळ्याची सोन्याची चेन व डिओ मोपेड असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सहायक पोलीस आयुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक वेताळ, पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, सहायक पोलीस फौजदार दिनेश शिंदे, नामदेव खिलारे, पोलीस अंमलदार बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे, अझरुद्दीन पठाण, संदीपकुमार गर्जे यांच्या पथकाने दमदार कामगिरी केली.