इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन मारहाण करणाऱ्यावर खुनाचा गुन्हा
कोथरूड पोलिसांत फिर्याद : कोथरुडमधील हाय स्कोअर कॅफेमध्ये घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन 5 ते 6 जणांच्या टोळक्याने 19 वर्षाच्या युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरुडमधील रामबाग कॉलनीतील हाय स्कोअर कॅफेमध्ये बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
रितेश काळे व त्याच्या सोबत असलेल्या 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सौरव गुलाबराव भोसले (वय ४६, रा. वारजेमाळवाडी) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा मुलगा विकी (वय १९) हा त्यांच्या मित्रासोबत हाय स्कोअर कॅफेमध्ये बुधवारी सकाळी बसला होता. त्यावेळी रितेश काळे व त्याचे साथीदार तेथे आले. इंस्टाग्रामवरील कॉमेंटवरुन त्यांनी विकीला शिवीगाळ करुन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोर जोरात मारुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. विकीच्या पाठीवर, कंबरेवर मारुन त्याला गंभीर जखमी केले. विकी याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस निरीक्षक बडे अधिक तपास करीत आहेत.
