आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विचित्र अपघातात ज्येष्ठ व्यापाऱ्याचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 25, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडी येथील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव वेगातील कारच्या विचित्र अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकास अटक केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) येथे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी हा अपघात झाला.

सुंदरलाल कांतीलाल घोलप ऊर्फ तात्या (वय ६४, रा. काळेपडळ, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रभू महादेवाप्पा महादर (वय २६, रा. मु.पो. कलकेरी, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. मिठानगर, दुगड स्कूल, पुण्याई निवास, कोंढवा) यास अटक केली आहे.

याप्रकरणी दाऊद तांबोळी (वय २१, रा. गंगानगर, हडपसर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे सहकारी सोरतापवाडी (ता. हवेली) येथे रस्त्याच्या कडेला थांबले होते. भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकून गाडीचे चाक सुंदरलाल घोलप ऊर्फ तात्या यांना लागल्याने त्यांचे हात-पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.