आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वीस आरोपींवर न्यायालयात 3816 पानांचे दोषारोपपत्र

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 25, 2022
Spread the love

आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरण : पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील पदाच्या निवडची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार होती. प्रश्न पत्रिकेमधील 100 पैकी 92 प्रश्न व त्यांची उत्तरे लिखित स्वरुपात व्हायरल करण्यात आली. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी वीस जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध 3816 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

विजय प्रल्हाद मुऱ्हाडे (वय-29 रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना), अनिल दगडू गायकवाड (वय-31 रा. किनगाव वाडी, जि. जालना), सुरेश रमेश जगताप (वय 28 रा. बोल्हेगाव, जि. जालना), बबन बाजीराव मुंढे (वय-48 रा. पळसखेड झालटा, जि. बुलडाणा), संदीप शामराव भुतेकर (वय- 38 रा. भाग्योदय नगर, औरंगाबाद), प्रकाश दिगंबर मिसाळ (वय-40 रा. ढोरकपोस्ट जि. बीड सध्या रा. वराळे ता. मावळ जि. पुणे), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय-36 रा. तिंतरवणे जि. बीड), प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय-50 रा. आंबेजोगाई), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय-36 रा. आंबेजोगाई), शाम महादू मस्के (वय-38 रा. आंबेजोगाई), राजेंद्र पांडूरंग सानप (वय-51 रा. शामनगर, बीड), महेश सत्यवान बोटले (वय-53 रा. मुलूंड (पश्चिम) मुंबई), नामदेव विक्रम करांडे (वय-33 रा. गयानगर, बीड), उमेश वसंत मोहीते (वय-24 रा. बलसूर ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), अजय नंदू चव्हाण (वय-32 रा. औरंगाबाद), कृष्णा शिवाजी जाधव (वय-33 बीड बायपास रोड, औरंगाबाद), अंकीत संतोष चनखोरे (वय-23 रा. काल्डा कॉर्नर, औरंगाबाद), संजय शाहूराव सानप (वय-40 रा. वडझरी, बीड), आनंद भारत डोंगरे (वय-27 रा. भेकराई नगर, फुरसुंगी, पुणे मुळ. रा. शेटफळ ता. माढा, जि. सोलापूर), अर्जुन भरत बमनावत उर्फ रजपुत (वय-30 रा. हर्सुल, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पुणे सायबर पोलिसांना जप्त केलेल्या साधनांमधून सबळ पुरावा मिळाला आहे. त्यामुळे आरोपींविरुद्ध 3816 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. आरोपींनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे प्रसारीत करुन शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.