आवृत्ती पुणे
← Back to Homepage

६४ वर्षीय वकिलावर बलात्कार प्रकरणी गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 26, 2022
Spread the love

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : ३८ वर्षीय महिलेला न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने केला अत्याचार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायालयातील सगळ्या केसेस चालवून न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वकिलाने 38 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आरोपी वकिलाने 2013 पासून आतापर्यंत वेळोवेळी अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्यात 38 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार वकील नंदकुमार डिकोजी पाटील (वय-64 रा. रिमझिम बंगला, विजयनगर कॉलनी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेचे आणि तिच्या पतीचे पटत नसल्याने मागील काही वर्षापासून त्या एकट्या राहतात. तर आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन न्यायालयातील सर्व केस चालवितो व न्याय मिळवून देतो असे आमिष पीडित महिलेला दाखवले. यानंतर फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय फिर्यादी महिलेच्या पाठीमागे कुटुंबीय नसल्याचे पाहून आरोपीने तिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी वकिल नंदकुमार पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

get_footer();