आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अज्ञात ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 28, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्याजवळ झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्याच्या पुढे मांजरी हद्दीमध्ये २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.

योगेशकुमार भट (वय २४) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी आशिषकुमार पाल (वय २१, रा. लॅवेश ग्रीन्स, मांजरी बु।।, ता. हवेली, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि योगेशकुमार भट मोटारसायकलवरून पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्याच्या पुढे चालले होते. त्यावेळी भरधाव वेगातील ट्रकची धडक बसून अपघात झाला. अपघातात योगेशकुमार भट यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता पळून गेला. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके पुढील तपास करीत आहेत.