जागतिक महिला दिनी भरोसा सेलच्यावतीने महिलांचा सन्मान
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शांत आणि निवांत मन हेच जीवनातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी उत्तम आणि अंतिम साधन आहे. प्रत्येकाने शांत राहून, संयमी व तणावरहित आनंदी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, असा सल्ला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला.
जागतिक महिला दिनानिमित्त गुन्हे शाखा भरोसा सेलच्यावतीने विधी अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, कौटुंबिक हिंसाचार, प्रि-मॅरेज कौन्सिलिंग, समुपदेशक, संस्था, एनजीओ महिला अधिकारी, महिला अंमलदार यांचा अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास गाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास गाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शामने, अर्चना कटके, योगिता बोडके, शहर व भरोसा सेलचा अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहायक पोलीस निरीक्षक योगिता बोडके यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शामने यांनी आभार मानले.
