आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा सराईत जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 25, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांची कारवाई : माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून करीत होता पाठलाग

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२१) सकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापूर रोडवरील बसस्टॉप येथे घडला आहे.

गणेश रोहिदास गजरे (वय-30 रा. मारुती मंदिराजवळ, साडेसतरानळी, हडपसर) याला अटक केली असून, प्रेम भंडारी (वय-25 रा. भैरवनाथ मित्र मंडळाजवळ, माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी गणेश गजरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपींनी पीडित मुलीचा पाठलाग केला. तसेच ‘तु पिंट्याच्या नादी लागू नको तो चांगला मुलगा नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला सुखी ठेवेन’ असे म्हणाला असता मुलीने त्याला नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी गणेश याने पीडित मुलीचा हात धरुन तिला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन धमकी दिली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मुलीला सतत फोन करुन त्रास दिला. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

get_footer();