आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वेळीच उपचार करून घेणे गरजेचे

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 8, 2022
Spread the love

डॉ. हरिभाऊ सोनवणे : डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य तपासणी

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना महामारीनंतर प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. कामाच्या रगाड्यामध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजार बळावल्यानंतर उपचारासाठी धाव घेतो. मात्र, तसे न करता वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे, असे मत जीपीएचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त डेक्कन पोलीस स्टेशन आणि जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या (जीपीए) संयुक्त विद्यमाने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची हिमोग्राम, रक्तशर्करा, ईसीजी तसेच सर्वसाधारण तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी जीपीएचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष श्रीराम जोशी, खजिनदार डॉ. शुबधा जोशी, सचिव डॉ. सुनील भुजबळ, सहसचिव डॉ. भाग्यश्री मुनोत, डॉ. संजय वाघ, डॉ. गुजराथी, डॉ. संजय बुटाला, डॉ. हर्षला बाबर, डॉ. संगीता थेनट, डॉ. सुराना, डॉ. दीपक गांधी उपस्थित होते.

डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर यांच्यासह सर्वांनी आरोग्य तपासणी करून घेतली. दीप पॅथॉलॉजी लॅब यांनी वैद्यकीय सेवा दिली.