आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हातभट्टी दारू विक्रेत्यावर मुंढवा पोलिसांचा छापा

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • May 31, 2023
Spread the love

गावठी दारू विक्रेत्या तिघांना अटक, 15 हजार रूपयांची गावठी दारू नष्ट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : इथल्या मुंढवा परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे गावठी दारू विक्री करणाऱ्या बजरंग जाधव, वय 62 वर्षे, राहाणार लक्ष्मीनगर मुंढवा, मनोज गुमाने वय 48 राहाणार भिमनगर, मुंढवा, अनिल गायकवाड, वय 51 वर्षे राहाणार केशवनगर मुंढवा यांच्यावर विविध ठिकाणी छापा कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.

या कारवाईत 15 हजार रूपयांची दारू नष्ट कऱण्यात आली. पुणे शहर परिमंडळ 5 चे पोलिस उप आयुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार, हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या सुचनेप्रमाणे छाप्यची कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे, पोलिस उप-निरीक्षक प्रमोद कोळेकर, पोलिस उप निरीक्षक धनंजय गाडे यांच्या चमूने ही यशस्वी कारवाई केली. या वर्षात शहरातल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन कऱण्यासाठी कारवाई करण्याची आदेश देण्यात आले आहेत.
त्यान्वये मुंढवा पोलिस ठाण्याकडून यापुर्वी गावठी हातभट्टी दारू विक्रीच्या 24, जुगार अड्ड्यांवर 15, अंमली पदार्थ विक्री 3 अशा एकूण 42 छापा कारवाई यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत.