अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ तासात आग आटोक्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्ड-गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिर परिसरात असलेल्या एका मंडपाच्या गोदामात रविवारी सकाळी साडे आठ वाजता आग लागली. आगीत ७ ते ८ गोदामातील साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे गोदामाशेजारी लावलेल्या २५ ट्रकला आगीची झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिराजवळ अनेक गोदामे आहेत. भागातील एका गोदामात रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 40 ते 45 बंब आणि सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले. या भागात गोदामे असल्याने आगीची झळ अन्य गोदामांना पोहोचण्याची शक्यता होती. मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व अग्निशमन दलाला जनानांनी तातडीने घटना स्थळी जावून आग आटोक्यात आण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही यामध्ये जीवीत हानी झाली नाही. गोदामातील सिमेंट, मंडप साहित्य, कपडे, साबण, रंग, काच, रबर, वायर, तसेच अन्य साहित्य आगीत जळाले. जवानांनी चोहोबाजूंनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. गोदामाच्या शेजारी वस्ती आहे. या भागात आग पोहोचू नये म्हणून जवानांनी काळजी घेतली. वारे जास्त असल्याने आग पसरण्याची शक्यता होती. या भागात जवळपास १०० गोदामे आहेत. ज्या गोदामात आग लागली होती.
यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे म्हणाले, आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व अग्निशमन दलाला जनानांच्या सह
पीएमआरडी यांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी युध्दपाळीवर प्रयत्न केले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु उन्हाळ्याच्या शेवटी अशा प्रकारच्या आगी लागतात. जोरदार वाऱ्या मुळेच आम्हाला आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण गेले. आग नियंत्रणात आली असली तरी गोडाऊन मध्ये पेंट, ट्रान्सपोर्ट साहित्य मोठ्याप्रमाणावर आगीत खाक झाले. जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी खूप झाली आहे.
















