आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लबाडीने दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue, Social • July 8, 2023
Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन परिसरात राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणाऱ्या अज्ञात आरोपीविरूद्ध फिर्यादीने तक्रार दिली होती. गुन्ह्याचा तपास केल्यानंतर बुद्धदेव बिश्वास, रा. काटेवस्ती, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने फिर्यादीची पार्किंगमध्ये लावलेली पांढऱ्या रंगाची केटीएम गाडी चोरी केली होती.
या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद म्हस्के यांनी केला.
आरोपीला 1 जुलै रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी अभियोक्ता प्रियंका वेगुर्लेकर यांनी कामकाज पाहून आरोपीला 6 महिने सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर कामगिरी सरकारी अभियोक्ता प्रियंका वेगुर्लेकर यांनी केली असून शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस फौजदार मोहन भापकर, पोलिस हवालदार सोनवणे, पोलिस शिपाई बेंद्रे यांनी कामकाज पाहिले.