आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शाहू कॉलनीतील मनपा शाळेतील संगणकाची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 26, 2021
Spread the love

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कर्वेनगर, शाहू कॉलनी गल्ली नं.१ मधील शाळेत कोविड लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून संगणक चोरून नेला. ही घटना २३ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच ते २४ ऑगस्ट २०२१ च्या दरम्यान आठ दरम्यान घडली.

याप्रकरणी समर्थ पवार (वय २०, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शाहू कॉलनी गल्ली नं.१ मधील शाळेत कोविड लसीकरण सुरू आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्याने २३ ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण केंद्र बंद होते. त्यामुळे केंद्राचे कुलूप तोडून संगणक चोरून नेला. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जे. एन. होळकर पुढील तपास करीत आहेत.