आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढव्यातील हगवणे वस्ती येथे ७० हजारांच्या ऐवजाची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करीत चोरट्यांनी ६० हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल असा एकूण ७०हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. कोंढवा बुद्रुक येथील हगवणेवस्ती, व्हीआयटी कॉलेजजवळ ३० ऑगस्ट रोजी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

राजेश झा (वय ३४, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.