आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्टया सोलापूर तालुका पोलिसांकडून उद्ध्वस्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

सेवालाल नगर व बक्षी हिप्परगा येथील घटना : आठ लाखांचे दारूचे साहित्य जागेवरच केले नष्ट

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : सेवालाल नगर व बक्षी हिप्परगा येथे अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया सोलापूर तालुका पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या. यात एकूण ८ लाख ४० हजार रूपये किंमतीचे ४० हजार लिटर गुळमिश्रित रसायन, १९० प्लॅस्टिक व ११ लोखंडी बॅरेल जागेवरच नष्ट करण्यात आले.


सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील मौजे सेवालाल नगर व बक्षी हिप्परगा या परिसरात चोरून चालणाऱ्या अवैध हतभट्टी दारूच्या भट्टया उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी सोमवारी आणि मंगळवारी (दि. ३० व ३१ ऑगस्ट) विशेष मोहीम राबवून पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्टयांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.


अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्टयांवर टाकलेल्या छापा कारवाईत, ४० हजार लिटर गूळमिश्रित रसायन, १९० प्लॅस्टिक बॅरेल व ११ लोखंडी बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करिता लागणारे साहित्य, असे एकूण ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य, दारूच्या हातभट्टया जागेवरच उद्ध्वस्त केल्या. तसेच प्लॅस्टीक व लोखंडी बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळमिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले.


सेवालाल नगर व बक्षीहिप्परगा या ठिकाणी अवैध दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण १० इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपास सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांचेकडून होत आहे.


यापूर्वीदेखील सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त करून कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसं बाबत गोपनीयरित्या माहिती प्राप्त करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले.
सदरची छापा कारवाई ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) सूर्यकांत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. नेताजी बंडगर, प्रवीण सपांगे, पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी व पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अंमलदार तसेच महिला अंमलदार यांनी बजावली आहे.