आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठाला चार लाखाला गंडविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 3, 2021
Spread the love

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनची कारवाई

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याची बतावनी करत एका जेष्ठ व्यक्तीला सायबर चोरट्याने 3 लाख 97 हजारांचा आर्थिक गंडा घातला. लॉकडाउन असल्याचे कारण सांगत वार्षिंक हप्ता इसीएस होणार नसल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी 56 वर्षीय नागरिकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल व मेलधारक व्यक्तीच्या विरुद्ध आयटी अ‍ॅक्टनुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 जून 2020 या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाषाण परिसरात राहायला आहेत. त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून तो एका खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. लॉकडाउन असल्यामुळे वार्षीक हप्ता इसीएस होणार नसल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करत चोरट्याने एक लिंक पाठविली. संबंधित लिंकवर क्लिक करण्यास सांगून सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 97 हजार रूपये ऑनलाईन स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून फसवणूक केली. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक विजयकुमार लांबतुरे करीत आहेत.