आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत टोळीकडून दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे उघड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 3, 2021
Spread the love

युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहरची कामगिरी : चौघांना घेतले ताब्यात

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

आंतरराज्यीय सराईत टोळीकडून दरोड्याच्या तयारीसह घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे.

दि. २४ ऑगस्ट रोजी संशयित रिक्षाचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सेनापती बापट रोडवरी शैलेंद्र सोसायटीजवळील स्वामी समर्थ रिक्षा स्टॅड येथे एक रिक्षा उभी असून त्यामध्ये काही इसम बसलेले आहेत. त्यांच्याकडे घातक शस्त्र असून ते कोठेतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करणार आहेत, अशी बातमी मिळाली.

त्या बातमीच्या अनुषंगाने संशयित इसमांना कारवाईकरिता ताब्यात घेण्याकामी सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस हवालदार राजस शेख, पोलीस नाईक दत्ता फुलसुंदर, पोलीस नाईक प्रवीण भालचिम, राकेश खुनवे, पोलीस शिपाई अशोक शेलार, सागर वाघमारे तसेच पोलीस हवालदार शीतल शिंदे यांनी छापा टाकून संशयित इसम साकिब शौकतअली अन्सारी (वय २३, मूळ रा. मु. मेहस्त्री, पो. कोतवाली ता. कोतवाली जि. बिजनौर, उत्तरप्रदेश, सध्या रा. नागपूर चाळ, देवरे हॉस्पीटल बाजूच्या गल्लीत, अनिल ऊर्फ घा-या कांबळे याचे घरात, येरवडा, पुणे, दानिश वारीस शेख (वय २२, मूळ रा. हुमायुनगर गल्ली नं. ०५, मेरठ गर्ल्स कॉलेजजवळ, ता. मेरठ, जि. मेरठ, राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे), रिक्षाचालक सलमान ऐहसान अलवी (वय २६, मूळ रा. कल्याणपूर, पो. मजेडासकरु ता. नगिना, जि. बिजनौर, उत्तरप्रदेश, सध्या रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे), वसिम शौकतअली अन्सारी (वय २४, मूळ रा. तेवडी मंजाळा, पोस्ट तेवडी, पो. स्टे धामपूर सेन्टर, ता. धामपूर, जि. बिजनौर, उत्तरप्रदेश, सध्या रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे) यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांचा एक साथीदार मोहम्मद अन्सार (रा. बिजनौर, उत्तर प्रदेश) हा झालेल्या गडबडीचा फायदा घेऊन पळून गेला होता.
आरोपींकडून लोखंडी सुरा, लोखंडी सत्तुर, लोखंडी तलवार लोखंडी कोयता इत्यादी घातक शस्त्र अत्याधुनिक फोल्डिंगची कटावणी, पोपट पाना स्क्रू ड्रायव्हर इत्यादी घरफोडीची साधने नऊ मोबाईल हॅन्डसेट व एक रिक्षा असा एकूण १,०१, ३४० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचेविरुद्ध दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करता आरोपीतांनी घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले आहे. आरोपींना चतुःशृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील पाषाण व बाणेर येथे दोन घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. त्याबाबत चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपींकडून वरील दोन्ही घरफोडींत चोरलेला मुद्देमाल त्यामध्ये सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने व रोख रक्कम १० हजार रुपये असा सर्व मिळून ९,०८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सर्व मिळून १०,०९३४० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हे बिजनौर, उत्तर प्रदेश येथील रहाणारे असून, पुणे शहरात तसेच पिंपरी चिंचवड, मुंबई व गुजरात येथे यापूर्वी त्यांनी गुन्हे केलेले आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर व पोलीस उप-निरीक्षक जयदिप पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त रवींद्र शिसवे, अति कार्यभार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे भाग्यश्री नवटक्के, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे – २ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या सूचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख, दीपक भुजबळ, शीतल शिंदे, विशाल शिर्के, दत्ता फुलसुंदर, अशोक शेलार, प्रवीण भालचिम, राकेश खुणवे, कौस्तुभ जाधव, प्रवीण कराळे, सुरेद्र साबळे, स्वप्निल कांबळे, संजय आढारी, रमेश राठोड, सागर वाघमारे यांनी केली आहे. सदर उत्कृष्ट कामगिरीबाबत सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.