आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शारीरीक संबंध ठेवून लग्नास दिला नकार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 3, 2021
Spread the love

कोथरुडमधील घटना : अनुसुचीत जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले़ त्यातून ती गर्भवती राहिल्यावर खालच्या जातीची असल्याचे सांगून लग्नास नकार देणार्‍या श्रेयस दत्तप्रसाद जोशी याच्यावर पोलिसांनी बलात्कारासह अनुसुचीत जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १९ जून २०१९ ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली.पोलिसांनी सांगितले की, श्रेयस जोशी याने फिर्यादी या अनुसुचीत जातीच्या आहेत, हे माहिती असताना सुद्धा त्यांना लग्नाच्या आमिषाने त्यांच्याबरोबर वारंवार बळजबरीने शरीर संबंध केले. फिर्यादी यांनी त्यांचे प्रेमसंबंध श्रेयस याच्या आई वडिलांना सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ करुन तू खालच्या जातीची आहे. आम्ही तुझा स्वीकार करणार नाही, असे सांगितले. या शरीरसंबंधातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. तेव्हा श्रेयस याने लग्न करण्याचे टाळून फिर्यादी यांच्या आईला औरंगाबाद येथे बोलावून शिवीगाळ केली व जीव मारण्याची धमकी दिली आहे.

अनुसुचीत जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे पुढील तपास करीत आहेत.