महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पिंपरी : जैन बॉक्स क्रिकेट लीग सीजन वन चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेते पद क्रेजी क्रिकेटर्स यांनी पटकावले. तर उपविजेते गोल्डन आर्म्स यांनी पटकावले. या स्पर्धेत एकून १४ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघात २ महिला व ७ पुरुष अशा पद्धतीने संघ बनवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी कृष्णा डायग्नोस्टिक, चामुण्डा स्टोन, व दिलीप सोनीगरा ज्वेलर्स यांनी सहकार्य केले. या स्पर्धेचे आयोजन वर्धमान बाफ़ना, राहुल चोरडिया व राजेश सोनिमिंडे यांनी एसएसए टर्फ़ चिंचवड़ येथे केले होते.
