महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : एसएससी परीक्षा सन २०२३-२४ मध्ये सुलाखे हायस्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांनी खुप मोठे यश संपादन केले आहे.
या विद्यालयाचा शेकडा निकाल 97.31% लागला. या परीक्षेला एकूण 271 विद्यार्थी बसले. त्यात विशेष श्रेणीसह 147 , प्रथम श्रेणी मध्ये 68, द्वितीय श्रेणी मध्ये 35, पास श्रेणीमध्ये 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयात आलेले ३ क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक संचिता महाजन 98.40% द्वितीय क्रमांक केतकी पाटील 98% तृतीय क्रमांक सुजल शिंदे 97.40% सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, संस्थेचे सचिव अनंत कवठाळे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, उपमुख्याध्यापक रा. द.इंगळे, पर्यवेक्षक प्र. वि. देशपांडे, पर्यवेक्षिका ऊ. फु. जावळे, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
