आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

टास्क ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषाने १५ लाखाची फसवणुक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 10, 2024
Spread the love

पुणे : धनकवडी येथील एका मध्यमवर्गीय नागरिकाचा विश्वास संपादन करुन अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन वेगवेगळे टास्क पुर्ण करण्यास सांगुन टास्क ट्रेडिंगमध्ये नफा मिळवता येवु शकतो असे आमिष दाखवुन ऑनलाईन लिंक पाठवुन १५ लाख ४० हजाराची फसवणुक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ऑनलाईन वेगवेगळे टास्क पुर्ण करण्यास सांगुन टास्क ट्रेडिंगमध्ये नफा मिळवता येवु शकतो असे आमिष दाखवुन आरोपीने ऑनलाईन लिंक पाठवुन त्याद्वारे फिर्यादी यांना बँकेच्या विविध अकाऊंटवर पैसे जमा करण्यास लावले. नफा मिळण्याच्या आमिषाने फिर्यादीने ५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले.

त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची व तपास सुरु असल्याची माहिती सहकार पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शी बोलताना दिली.