महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : शहर आणि तालुक्यातील सहा स्कुल बस आणि दोन टिप्पर या वाहनांवर दांडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक अविनाश अंभोरे यांनी दिली आहे.
बार्शी भागातील सेंट जोसेफ, झाडबुके संस्थेचे घारी कॉलेज, अर्णव आणि पोदार या शाळेच्या सहा बस ची तपासणी करताना कागदपत्रे अपूर्ण आढळून आल्यामुळे त्या सहा बस ला दीड लाखाचा दंड करण्यात आला आहे तर दोन टिप्पर ओव्हरलोड आढळून आले त्यांना प्रत्येक तीस हजार रुपये दंड करण्यात आला आहे.
वाहन निरीक्षक अविनाश अंभोरे, धीरज डोईफोडे, पुष्कराज गाढवे यांनी दि १९ जून ला कारवाई केली आहे. तसेच मागील महिन्यात एका टिप्पर ला तब्बल ८२ हजार रुपये दंड केल्याचे ही सांगितले आरटीओ ऑफिस सोलापूर मध्ये आहे.
आरटीओ अधिकारी आठवड्यातून कॅम्प साठी येतात तरीही ज्या ज्या वेळी तपासणी करताना अशी बेशिस्त, अनफिट वाहने निदर्शनास येत असतात त्या त्या वेळी कारवाई करत असतात तरी वाहन धारकांनी आपली वाहने नियमित करून घ्यावी असे आवाहन अंभोरे यांनी केले.
तसेच ज्या वाहन धारकांना काही अडचण आली किंवा सोलापूरला पासिंगला जाण्यापूर्वी काही मार्गदर्शन हवे असेल तर त्यांनी कॅम्प दिवशी दिवसभरात येऊन माहिती घ्यावी असे ही सांगितले. तसेच बार्शीतील ओव्हरलोड वाहनांवर विशेषतः गौण खनीज वाहतूक करणाऱ्या आम चे बारकाईने लक्ष आहे असं सांगितले.
