आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आळंदीच्या बस अपघातप्रकरणी २९ हजारांचा दंड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 6, 2024
Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : आळंदी-मरकळ रोडवरील दाभाडे सरकार चौकाजवळ गुरुवारी झालेल्या शालेय बस अपघातप्रकरणी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) बस मालक आणि चालकावर कारवाई केली आहे.

बस मालकाला २९ हजार रुपयांचा दंड केला आहे. तर बस चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याची नोटीस बजावली आहे. बसवरील नियंत्रण सुटल्याने गुरुवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी एमएच १२ केक्यू ००२१ या क्रमाकांची बस आळंदी भरकळ रोडवरील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीच्या कठड्याला धडकली होती.

कठडा तोडून बस आर्धी पुलाच्या बाहेर गेली होती. स्थानिक नागरिकांनी बसमधील मुलांना तत्काळडकीच्या काचा फोडून बाहेर काढले होते. या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता.