• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

बासमती तांदूळ आणि बिर्याणीचे अतूट नाते

July 8, 2024
0
08 07 24 3
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : भारतात तांदळापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये बिर्याणी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा आणि लोकप्रिय पदार्थ आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार असे आढळून आले आहे की भारतात तीन ॲप्सवर प्रति मिनिट सरासरी २०० बिर्याणीची ऑर्डर दिली जाते. जी वर्षाला दहा कोटी बिर्याणी पर्यंत जाते. बिर्याणी ही पौष्टिक आरोग्याला त्रासदायक नसणारी, परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी आहे. त्यामुळे ही डिश लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय आहे. बासमती तांदूळ आणि बिर्याणी यांचे अतूट नाते आहे. धान्याचा राजा तांदुळ आहे तर बिर्याणीचा राजा बासमती आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात बासमती तांदळाची विक्री जास्त होत आहे आणि त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे 7 जुलै महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक बिर्याणी दिवस म्हणून साजरा केला जातो. तयार अन्न वितरणाची सेवा पूरवणाऱ्या एका कंपनीने जानेवारी 2023 ते जून 2023 दरम्यान दिलेल्या ऑर्डरचा डेटा सादर केला आणि त्यात 2022 च्या तुलनेत मागील साडेपाच महिन्यांत बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये तब्बल 8.26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मागील वर्षाच्या एका रेकॉर्डनुसार 7.6 कोटींहून अधिक बिर्याणी ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत. बिर्याणीच्या ऑर्डरबाबत विचार केल्यास ज्या शहरांनी सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली त्या शहरांमध्ये पहिला क्रमांक बेंगळुरुचा आहे. त्यानंतर मुंबई दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते.

बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे. बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.

बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे. बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये फरक आहे.

तांदळापासून खिचडीभात, मसालेभात, डाळभात, केसरी भात, नारळी भात, पुलाव, बिर्याणी असे विविध प्रकार बनविता येतात. हे सर्व पदार्थ आरोग्यास सकस व पौष्टिक असतात. पण, त्यात बिर्याणीचा सगळ्यात वरचा नंबर आहे. बासमती तांदूळ हा बिर्याणीचा अविभाज्य भाग आहे. तांदूळ हे जगातील सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्या मुख्य अन्नांपैकी एक आहे, तीन अब्जाहून अधिक लोक उर्जेचा प्राथमिक स्त्रोत म्हणून त्यावर अवलंबून आहेत.जगभरातील अनेक देशांमध्ये हे मुख्य अन्न आहे.

जे एक पौष्टिक आहे आणि ते लहान बाळापासून,आजारी, वयोवृद्ध असे सर्वाना चालते .तांदूळ हे भारतातील सर्वात महत्वाचे अन्न पीक आहे जे एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे एक चतुर्थांश भाग व्यापते आणि भारतीय लोकसंख्येच्या अर्ध्या लोकांना अन्न पुरवते. त्यामुळे भारत सरकार ही रेशनमध्ये प्रामुख्याने लोकांना शिधा म्हणून तांदूळ देते. आयुर्वेदात तांदळाची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. असे म्हणतात पृथ्वीवर अस्तित्वात आलेले तांदूळ हे पहिले तृण धान्य आहे.

बहुतेक सर्व रोगांमध्ये अशा प्रकारच्या जुन्या तांदळाचा पथ्य म्हणून उल्लेख केलेला सापडतो. वेदांमध्येही तांदळाचा उल्लेख सापडतो. भारतीय संस्कृतीनुसार यज्ञ, पूजा, लग्नकार्यात तांदळाचा उपयोग केला जातोच, पण जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशोवृद्धीचे प्रतीक मानले जाते. भारतातील सिंधू खोऱ्याच्या दोन्ही बाजूला बासमती तांदळाच्या उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन केले जाते.

बासमती तांदूळ ग्राहकांच्या गटांमध्ये वाढत्या पसंतीस उतरत आहे, मुख्यत्वे त्याच्या उत्कृष्ट चव आणि इंद्रियांना अत्यंत आनंद देणारा सुगंध आहे. बासमती तांदूळ भारतातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार या उतेरकडील राज्यांत होतो. जागतिक स्तरावर ओळख असलेल्या आणि मागणी असलेल्या वाणांमध्ये बासमती 1121, 1401 बासमती, कस्तुरी, हरियाणा बासमती, पुसा बासमती, वल्लभ बासमती इ.चा समावेश आहे.

भारत हा जगातील बासमती तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. देशातील वार्षिक उत्पादन वर्षाला सुमारे 8 – 12 दशलक्ष टन इतके आहे, ज्यापैकी सुमारे दोन तृतीयांश निर्यात केले जाते. उरलेला देशांतर्गत वापरला जातो.जगात चीन नंतर भारत सर्वात जास्त तांदूळ निर्यातदार देश आहे. एकूण भारतीय तांदूळ निर्यातीमध्ये बासमती तांदळाचा वाटा 30% ते 40% च्या श्रेणीत आहे तर तांदूळ निर्यातीत गैर-बासमती तांदूळाचा वाटा 60 ते 70% आहे. भारत दरवर्षी जगभरातील जवळपास 132 देशांना बासमती तांदूळ निर्यात करतो आणि भारतीय बासमती तांदळाची प्रमुख निर्यात ठिकाणे म्हणजे इराण, इराक़ सौदी अरेबिया, UAE आणि यूरोप आहे.

8 7 24 6

Latest Articles

4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 2, 2026

क्या जैन धर्म में भी होलाष्टक माना जाता है अमंगलकारी? जानिये सच !!

February 28, 2026
Load More
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पायी चालत वारीत सहभाग

Next Post

खडक पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई, चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026
२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

March 5, 2026
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

March 5, 2026
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta