आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुख्य व्यवस्थापकानेच घातला कंपनीला ५३ लाखाचा गंडा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 16, 2024
Spread the love

पुणे : विमाननगर परिसरातील एका कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकानेच कंपनीला ५३ लाखाचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.या बाबत बावधान मधील फिर्यादीने विमान नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा मुख्य व्यवस्थापक असलेल्या इसमाने कंपनीने विश्वास ठेवुन दिलेल्या जबाबदारीचा व अधिकाराचा गैरवापर करून कंपनीचा विश्वासघात करून कंपनी खात्यावरील ५३,९०,०००/-रू. चे एकुण १०,००० शेअर्स स्वतःचे खात्यावर घेऊन कंपनीची फसवणुक केली आहे. हा तपास पो. उप. निरी. रविंद्र ढावरे करीत आहेत.