आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 17, 2024
Spread the love

पुणे : महाराष्ट्र कारागृह पुणे विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे प्रकाशन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृहांतर्गत बदल, कैद्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजना, उपक्रमांची माहिती, महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकद्वारे मांडण्यात आली आहे.

अमिताभ गुप्ता यांनी १८ जुलै २०२२ रोजी कारागृह विभागाचा पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून १५ जुलै २०२४ कालावधीत विविध कारागृहांचे रुपडे पलटण्यात आले. कैद्याच्या सुख-सोयीसाठी नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात आल्या.

त्यामध्ये नन्हे कदम, गळाभेट, दुरध्वनी योजना, वॉशिंग मशिन, स्वच्छ पाण्यासाठी वॉटर प्युरीफाइड्, कौटुंबिक भेटीसाठी ज्यादा वेळ, सी सी टी व्ही यंत्रणा, भजन स्पर्धा, शेती उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यासोबत नाविन्यपुर्ण योजनामुळे कैद्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

कारागृहांतर्गत बदल, कैद्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजना, उपक्रमांची माहिती, महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकद्वारे मांडण्यात आली आहे. कॉफी टेबल बुकचे अनावरण अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले, कारागृहातील कैद्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले आहे.

विशेषतः कारागृहातंर्गत स्वच्छता, कैद्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे कैद्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होवून आजारपणाचे प्रमाण घटण्यास मदत झाली. डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले, राज्य भरातील बहुतांश कारागृहातंर्गत सुरु केलेल्या विविध उपक्रमाद्वारे कैद्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.

त्याचे संपूर्ण श्रेय अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा पाठपुरावा योग्य वेळेत करण्यात आला. त्यामुळेच कारागृहातंर्गत कैद्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक पातळीवरील योजनांची अंमलबजावणीही तितक्याच तत्परतेने संबंधित अधिकाऱ्यांनी पार पाडल्याचे सांगितले. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी केले.