आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

टास्कतून नफ्याच्या आमिशाने १२ लाखाची फसवणुक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 17, 2024
Spread the love

पुणे : शिवणेतील एका तरुणाला टास्क मधून नफ्याचे आमिष दाखवून त्याची १२ लाख ८१,७१८/- रुपयांची आर्थिक फसवणूकीचा प्रकार घडला आहे. या बाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुकीचा हा प्रकार मे महिन्यात घडला आहे. २३ ते २६ मे या काळात ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना मोबाईलधारकाने संपर्क साधुन गुगलमॅप रिव्हयूव्ह टेड्रॉग अशा वेगवेगळ्या नावाने टास्क पूर्ण करण्यास सांगितले.

जास्त कमिशन मिळण्यांचे आमिष दाखवुन बँक अकाऊंटवर व युपीआयडी वर पैसे जमा करण्यास सांगुन १२,८१,७१८/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे करीत आहेत.